माझी सत्वापरिक्षा

टाइटल बघून चरकू नका अलका कुबल च्या सुपर हिट मराठी चित्रपटाचा अणि ह्याचा कही एक सम्बन्ध नाही आहे   माणसाला त्याच्या  आयुष्या मधे एकदा न एकदा तरी सत्वापरिक्षा द्यावीच लागते .तसा विद्यार्थी समुदाया  साथी प्रत्येक  परीक्षा ही सत्वापरिक्षाच असते  पण तरी सुद्धा ह्या सर्वा संकटांची बाप म्हणजे सत्वापरिक्षा .ह्या परिक्षे चे विषय आपण नाही ठरवत अणि ह्याची तारीख सुद्धा आपण नाही ठरवू शकत .म्हणजे एका अत्यंत लाचखोर सरकारी नोकाराच्या डोक्या वर जर एखादी गाँधी ,नेहरु ची औलाद आली की मग त्यची सत्वापरिक्षा सुरु होते ...अभीयांत्रिकी च्या विद्यार्थ्या साथी तोंडी परीक्षा सत्वापरिक्षाच असतात ,लग्नाला आलेल्या मुली / मुलांच्या सत्वापरिक्षेला "कांदा पोहे " हा सक्तिचा विषय असतो ..मैत्रिण लाथ मारून स्वताच्याच मित्र बरोबर पळुन गेली किवा कही मुलांच्या साठी गेलेली मैत्रिण परत आली की मग सत्वापरिक्षा सुरु होते ,हरभजन सिंह ची एंड्र्यू स्य्मोंड्स ४० व्या ओवर मधे स्ट्राइक वर आला की सत्वापरिक्षा सुरु होते अणि राहुल द्रविड़ स्ट्राइक वर आला की बाकि सर्वांची  सत्वापरिक्षा सुरु होते   .तर मतित अर्थ काय तर सर्वाना त्यंच्या आयुष्या मधे सत्वापरिक्षा ही द्यावीच लगते. पण माझी सत्वापरिक्षा एवढी बिकट अणि वैविध्य पूर्ण असेल असा मला स्वप्नात सुद्धा वाटला नाही .
                                                              माझ्या सत्वापरिक्षे साठी जरा जास्तच अवघड पेपर सेट केला आहे ,नक्कीच शिवाजी विद्यापिठा च्या अणुरेणू शास्त्रा (electronics) च्या एखाद्या मयत प्रोफ़ेसर ने सेट केला असणार  नरकात बसून . काही  लोक परीक्षा होम ग्राउंड वर देतात हो पण मला तर तो सुद्धा एडवांटेज दिला गेला नाही . ही परीक्षा सुरु होंण्या   अधि माझा आयुष्य किती सुरेख होता मी ,माथा  अणि विक्रम तिघे समाजसुधारणा करण्या मागे झटून  लागलो होतो रोज एका नविन होटल व्यावास्यिकाचा आम्ही उद्धार करायचो .पण समाजसुधाराकांचा    अंत असाच होतो ,सावरकरना नाही का अंदमान मधे पाठवला तसाच मला सुद्धा दिल्ली ला पाठवन्याचा कुटिल डाव खेळला गेला .हे कार्य करण्या मागे प्रशांत नाइक अणि रंजित रमण ह्यांचा सिंहाचा  वाटा  आहे ...कोक्नास्था बामन शेवटी . 
                                                                    तर २००७  च्या सपटेंबर महिन्या मधे मी दिल्ली मधे आलो. पूर्वी च्या कळि राजे गडा वर आले की जशी तोफांची सलामी द्यायचे किवा अत्ता कसा कोणी तरी शहीद झाल्या वर देतात तशी सलामी मला मिळाली कारण मी दिल्ली मधे यायला अणि बोम्ब स्फोट होण्याला एकाच दिवस ठरला होता .
                                          माझा ऑफिस सरकारी आहे ...सरकारी ह्या शब्द मधेच सगळा कही आला त्या मुले मला अणि एक्स्ट्रा टिका करण्याची गरज नाहीच .पुण्या मधून येताना "दिल्ली मधे बरीच हीरवळ आहे बर का केदया  " असा मित्रानी १०० दा डोळे मारून मारून सांगितला होता .ऑफिस मधे हीरवळी आहेत  खरा माझ्या पेक्षा २० वर्षाने मोठ्या  ...बोललो ना सरकारी ऑफिस . माझे दोन सहकर्मचारी एक भैय्या युपि च अणि दूसरा रजनीकांत फेन क्लब च मेड इन आंध्र प्रदेश ,विज्नन . 
एक दिवशी मी विज्नन ला एक रिपोर्ट बनवायला सांगितला होता "कल कर दिया " तो म्हणाला . मला वाटला चला काम संपला "अच्छा तो दे दो रिपोर्ट " मी म्हणालो ,"मई बोला ना कल कर दिया " तो टिपिकल साउथ इंडियन हसत म्हणाला ,"हा तो दो ना मुझे " मी माझा वैताग लपवत म्हणालो ,"अरे कल कर दिया यार " , मी त्यच्या डोक्यात मारायला दगड हुड्कत होतो पण तेवढ्यात मला साक्षात्कार झाला "कल कर दिया " म्हणजे  काल केल नाही तर "उद्या करतो "   .तर असा माझा सहमित्र ,मानाने एक दम साधा ,कही ही विचारला की "its your choice yaar !!" . काय रे आज तमिळ भवन ला चिक्कन चेत्तीनाद हाणायाला  जायचा का ? ..its your choice yaar !! . आज कान्नोत  प्लेस  ला जायचा का ? ....its your choice yaar !! .स्वताचे विचार कसे  नसावेत ह्याचा जिवंत उधारण .आणि दुसया महाभागा ची स्तुति करावी तेवढी कमीच चालत्या लिफ्ट मधे ग्राउंड च्या बदली स्टाप च बटन दाबणारा अणि रोज बस मधे कुणाशी तरी बाचाबाची (अर्थात बा चा बा ची) . पाहिले ४ महीने मी ह्या प्राण्याला रूम वर सुद्धा सहन केले ...प्राणीमात्रान वर एवढी दया खुद्द पामेला एडरसने सुद्धा कधी केलि नसेल .म्हणजे रोज "मी ह्याचा तोंड का  फोडत नाही ?" हा प्रश्न येउन सुद्धा काही न करण्या एवढा सय्यम जर गाँधी ना कस्तूरबा नि "बापू आज जेवायला चिक्कन करू का हो ?" असा विचारला असता तरी त्यानी दाखवला नसता .
                                दूर जाणारे जवळचे मित्र अणि सोबत अशे ध्यान ...खरेच हलाखीचे दिवस होते ते .एकटाच रोज ४-५ की.मी चालत जाणे अणि कुठल्याश्या टीवि शोरूम जवळ तासन तास एकटाच मैच बघून हे दिवस मी काढले .मित्रांच्या बरोबर तोंडली ,दुधी भोपळा आणि भोपळा   ह्यांचा सलाद सुद्धा मी आनंदाने खाल्ला असता पण इकडे चिक्कन रोगन जोश सुद्धा घश्या खली उतरत नवत . एखाद्या अस्सल दारुडया  ची २ अक्टूबर ला जशी हालत होते तसा गलितगात्र झालो होतो मी .
                                               पण म्हणतात न बुडत्याला काठी चा आधार ...मला काठी नाही चांगले दोन ओंडके मिळाले ,ओमकार अणि गोविन्द दोघानी मला खुप साथ दिली .दोघा माझ्याच गाव चे मित्र समुदाय सुद्धा एकाच त्या मुळे  आठवणी ना  उजाळा  देंत   मधे शनिवार अणि रविवार चान  जाऊ लागले .मडी हाउस जवळचा "अम्मा की रसोई " हा आमचा नविन कट्टा होता .ह्या  कट्टा वर बसून आम्ही पुणे अणि मिरज इथल्या कट्टा डिसकस करायचो . पण नियति च्या.... xxxxxxx...ओमकार ची सत्वापरिक्षा नेमकी तेव्हाच शेड्यूल झाली अणि त्याला गुजरात मधे जावा लागला .गोविन्द तसा संसारी पुरुष आहे (लग्न झाला आहे त्याचा ) खरा तरी सुद्धा ओमकार जाताना गोंद्य च्या डोळ्यात पाणी आल  होता  . ओमकार ला  वर पहिल्या ५ मिनिटा मधेच आम्ही खुप जवळचे मित्र बनलो होतो .नंतरचा कही काळ मी अणि गोविन्द ने "ओमकार असता तर ? " ह्याची वेग वेगळी उत्तर शोधण्यात घालवला .ओमकार च्या हातची रस्स्या ची चाव आज सुद्धा तोंडाला पाणी आणते .प्रतेक फ़ोन ची सुरवात मी अणि ओमक्या "२००८  मधे पुण्यात भेटू भावा " अशी करतो अणि मग एक नीरव शांतता पसरते कही काळ....काही तरी अद्न्यात सूचित करणारी ......
                                           लाइफ परत एबनोरमल  ला परत आली होती .कधी कधी जगातली सगळ्यात पापी माणसा सुद्धा कधी कधी चांगला काम करतात ,रावण सुद्धा मरायच्या आधी राम म्हणाला होता म्हणे ...खरा तर त्याने राम तुझ्या ...xxx  मधे    yyy  अशी अस्सल कोल्हापुरी शिवी हसडली होती खरा नंतरचा पार्ट ऐकु  येण्या आधीच मी.हनुमान बेम्ब्मी च्या देठा पासून जय श्री राम म्हणुन कोकल्ला . असू दे मुद्द्य कड़े वळुया तर आनंद सिंह ने एक चांगला काम केल त्यच्या कॉलेज च्या एक दोस्त विशाल पाटिल च्या रूम वर जागा होती सो आम्ही शिफ्ट करायचा  ठरवला .पहिला आनंद चा मित्र म्हणुन मला धास्ती होती खरा विशाल जरा नोर्मल वाटला त्या मुळे  मी रूम बदलली . इकडे माझ्या सत्वापरिक्षे च्या प्रश्न पत्रिके मधे विशाल ,गणेश ,रसिक अणि धरम नावाच्या कही नविन प्रश्न ची भर पडली .
                   नविन रूम मला लगेच आवडली कारण इकडे टीवि होता अणि तो सुद्धा माझ्याच रूम मधे ठेवला होता .सुभाष मी अणि धरम आमच्या तिघांचा चांगला सूत जमला होता .विशाल अणि गणेश मराठी असल्याने संवाद वाढत गेले . अणि एक नविन कैरेक्टर मला शोले मधेल्या बसंती ची अठवण करूँ देता टी म्हणजे आमची स्वयापक करणारी दीदी . कित्त्तेक दिवसानी मी घरचा जेवण  खाल्ला होता ,नाही तर अत्ता पर्यंत १ ग्लास जूस एवढ्या वरच माझी गुजारणा व्हायची . शेवटी आवारे चा रस्सा पीणारा राजमा चावल कसा पचवेल हो ? .
                                          बहुदा दिल्ली  मधल्या होटल्स चा मेनू कार्ड सामुदिक सभे मधे ठरवला गेला आहे त्या मुले ह्या मेनू कार्ड मधे राजमा चावल ,छोले चावल अणि पराठे सोडून दूसरा कही शोधून दाखवा ..बक्षिस देतो . चांदनी चौक मधल्या हल्दीराम मधे जेवण खुप चान मीळत असा मला माझ्या एका दिल्ली च्या मित्राने सांगितला मी अणि गोविन्द अगदी उत्साहाने तिकडे गेलो अणि वेज  थाली  चा मेनू बघितला ...दल मखानी ,छोले ,मिक्स वेज  अणि रोटी ..."तुझ्या आई ने  तुला वर्ष भर एकच भाजी घातली होती का रे खायला ....भxxx   " गोविन्द ने तोंड साफ़ करून घेतला ,बरा  झाला त्याला मराठी येत न्हावत   .शेवटी हल्दीराम मधला सुद्धा जूस पिउन आम्ही एवढासा तोंड करून घरी परत आलो .
                                      घरी आलो तर सुभाष  बियर च्या बाटल्या ओपन करून तयार होता ...हे सगळा माझ्या साठी नविनच होता म्हणजे माझ्या ऑफिस खाली ५ वाजल्या पासून जरी बेवडे राउंड टेबल कॉन्फरन्स करत असले तरी घरी हे पहिल्य्न्दाच बघत होतो. मी कोक  वर समाधान मानला ..धरम अणि सुभाष एका वर एक रिचवत होते .शेवटी साठा संपल्या वर त्याना थांबवा लागला अणि मग  सुभाष ने  "philosophy of life"  ह्या विषय वर संवाद सुरु केला मी सुद्धा माझे विचार मांडले पण कही वेळाने मला दुष्टान्त झाला की हे जे उद्दत विचार मी ऐकतो  आहे ते दारू च्या कृपे मुळे आहेत . मग मी माझी मत बाजूला ठेउन मोबाइल चा रिकॉर्डर सुरु  केला अणि मजा बघत  बसलो .
                                               सगळे दारुडे दारू पिल्या वर इंग्लिश वर का घसरतात काय माहित ..सुभाष अणि धरम सुद्धा त्यातलेच .सुभाष तरी चांगला इंग्लिश बोलतो पण धरम ..."you see that i dnt see?"...वा वा ...दोन बेवडे इंग्लिश मधे बोलत असताना तुम्हाला अणि कुठल्या ही विनोदी कार्यक्रम बघण्याची गरज नाही . पण धरम सुभाष एवढ्या वर थांबत  नाहीत  ,मग ते गुलाम आली च्या रडक्या ग़ज़ल लावतात पण हे एक ठीक आहे हो ....हे महापुरुष त्या ग़ज़ल वर डिस्को डांस करतात अता बोला ....
                    दारूडया च्या संगतीची कही औरच मजा असते .असेच एकदा मी सुभाष अणि त्यच्या ऑफिस मधले दोस्त असे १७ लोक कुल्लू मनाली फिरायला गेलो होतो  . १७ जणा मधे २ मुली ,मी गणेश अणि रसिक हे सोडले तर बाकि सारे अट्टल बेवडे . रात्रि सगले जन प्यायला बसले दिल्ली अणि बंगलोर मधे क्रिकेट मैच सुरु होती .दारू च्या नशे मधे एव्हाना अमरेश "रोजर फेडरर क्यों नहीं खेल रहा है ?" हा प्रश्न ५ दा विचारून बसला होता .म्यूजिक पूर्ण आवाज  मधे होता .शेवटी पिउन झाल्या नंतर जेवण करायचा  ठरवला अणि मुलीना त्यांच्या रूम मधून बोलावन्या साठी मुकेश सान (सान म्हणजे जापानी  मधे सर...सुभाष ची कंपनी जापानी आहे  ) ह्याना पाचारण करण्यात आला ....अर्ध तास होऊं गेला मुकेश सान अणि मुली दोघांचा सुद्धा काहीच पत्ता नाही  .मग शुद्धि वर असलेला गणेश गेला अणि पोट धरून हसत परत आला .मुकेश सान नि  होटल मधल्या सगळ्या रूम  वाजवल्या होत्या ..मुलींची रूम सोडून .थोड्या वेळाने मुकेश सान परत आले  अणि निष्पाप चेहरा करत बोलले "लड़किया भाग गयी है " .दारूडया च्या संगती मधे तुम्ही पूर्ण एन्जॉय करू शकता ...फक्त तुम्ही शुद्धि वर हवे .धरम दारू पिल्या वर एक दम तत्वन्यान सांगतो म्हणुन आज कल आम्ही त्याला funadefeku baba म्हणतो .धरम ला पाजणे अणि मग त्यचे फंडे ऐकने हे माझा अणि सुभाष चा वीकएंड चा आवडता टाइम पास .
                                    त्या मानाने बाकीचे लोक नोर्मल .रसिक आपला वीकएंड पूर्ण दिवस एकच रूम मधे बसून चित्रपट बघन्या मधे  अणि स्वामी नारायण ह्यांच्या वरची पुस्तक वाचण्या मधे घालवतो .हे सगळा करताना तो खरच  एका समाधिस्थ साधू सारखा अचल असतो . एकदा मी अणि सुभाष गैस वर तापायला ठेवलेला दूध तसाच विसरून बाहेर गेलो होतो .आम्ही येउन बघतो तर काय दुधाच पातेला जळुन काळ पडला होता अणि वरच्या लकडी कपटाला कधी ही आग लागली असती ,जळलेल्या  दुधाचा वास पूर्ण रूम मधे भरला होता ...खरा ही घटना सुद्धा रसिक बाबांची समाधी तोडू नाही शकली .
                                 विशाल ला के.सी .बोकाडिया ,टी .राम राव अश्या दिग्दार्शाका बद्दल अत्यंत आदर आहे त्यांचे  सगळे  चित्रपट तो न कंटाळता बघतो .चंडाल ,वन  मन आर्मी ,मेरा अग्निपथ ह्या सारखे चित्रपट तो पुन्हा पुन्हा बघतो .एवढेच नाही तर  बलिकवाधू , राखी का स्वयंवर यांचे TRP रेटिंग घसरणार  नाही  ह्या कड़े त्याचे खास लक्ष्य असते .विशाल आमच्या घरचा एकाउंटेंट आहे हिशेब करण्याचे काम तो करतो अणि सगळ्या एकाउंटेंट प्रमाणे नेहमी चुकतो .विशाल शारुख खान चा फेन आहे दर शनिवारी जसा  नियमित पणे  एखादा पेलवान मारुती ला जातो त्याच नियमित पणे तो चख दे इंडिया किवा कुछ कुछ होता है बघतो .इंडिया अणि पाकिस्तान मैच सुरु असताना सुद्धा "केदार चख दे बघू का ?" असा विचारायचा  तो मुर्खपणा  हमखास करतो 
                                 गणेश ला आम्ही मजदूर यूनियन  म्हणतो कारण कंपनी त्याच्या कडून रात्रि १२ वाजे पर्यंत मजूरी करून घेती .पण रात्रि २ वाजता घरी आल्या वर गणेश च्या अंगा मधे भीमसेन जोशी येतो अणि मग तो रात्रि २ वाजता सगळा घर त्यच्या शास्त्रीय संगीताने डोक्या वर घेतो .तसा आमचा गणु चांगल्या कविता करतो .त्याच्या सोडून गेलेल्या मैत्रिणी वर केलेल्या सगळ्या कविता एकदा त्याने मला सलग ऐकवल्या होत्या . ती प्रतेक कविता ऐकताना मला मैत्रिण नसल्याचा अभिमान द्विगुणित होत गेला .अणि त्याची मैत्रिण त्याला का सोडून गेली ह्याचा अंदाज़ लागला .
                                       आम्ही सर्व जण  एकदा जिम कॉर्बेट ला गेलो होतो वाघ बघायला (दिसला नाही ही गोष्ट वेगळी ) ..गाड्या तयार होत्या सफारी ला जाय साठी  .आम्ही १३ लोक एकत्र होतो १४ वा गणु दिसत न्हवता ,नीट बघितल्या वर गणु एका झाडा खाली हातवारे करताना दिसला ,नंतर लक्ष्यात आला की तो हातवारे करून गाण म्हणतो आहे .गणु ला बोलवायचे आमचे सगले प्रयत्न व्यर्थ होते कारण काना मधे हेडफ़ोन होता अणि डोळे बंद .प्रत्यक्षात वाघ जरी आला असता तरी गणु हलला नसता
, माझ्या जीप मधे असलेले दीपक अणि कंपनी अत्यंत फालतू जोक्स मारत असल्याने ते जोक्स ऐकुन     वाघ  काय  शेळी सुद्धा आम्हाला अडवी नाही आली .एक दिवशी रात्रि २ वाजता गणु लव "आज कल बघत" होता "कई गणु झोप यावी म्हणुन असा बोर पिक्चर बघतो आहेस का ?"  मी , "नाही रे आठवण येती आहे  " गणु रडवेले तोंड करून म्हणाला ...त्याच्या  पुढील  रात्रि तो "खुनि चुडैल " बघत होता .
                             माझी क्रिर्केट ची आवड  सुद्धा सुभाष अधून मधून पूर्ण करत होता कधी शुभ मुहुर्त आला की शनिवारी आम्ही खेल्यला जायचो ,ग्राउंड जरी लहान असला अणि खेळणारे कमी तरी सुद्धा माझी बैटिंग ची हौस भागवण्या साठी ते पुरेसा होता .पण मग मी दमलो आहे असा कारण सुभाष पूर्ण आठवडा भर सांगत  असायचा .
                            घर ते ऑफिस अणि ऑफिस ते घर असा ९ ते ५ चा आयुष्य जगण्या साठी नंतर त्रास होऊ नए म्हणुन त्याची आत्ताच प्रक्टिस माझे दूरदर्शी रूममेटस अत्ता पासूनच करता आहेत म्हणुन रात्रि १० नंतर ते शक्यतो जागत नाहीत  .हो वीकएंड मात्र एक्स्सेप्शन आहे ..वीकएंड ला ते रात्रि ११ वाजे पर्यंत जगे असतात .
                           पण आज कल मी बरीच सुधारणा घडवून आणल्या आहेत ...आज कल घरून आलेले   खाऊ चे डबे पलंगा खाली लपून नाही रहत अणि कोमन च्या नोटबुक मधे २ रूपया ची एंट्री नाही होत . 
                         पण ह्या सर्वानी  माझा एकटे पणा नक्कीच घालवला आहे हे नक्कीच सत्वापरिक्षे मधे ग्रेस मार्क्स मीळाल्या  सारखा आहे  .हो पण आज सुद्धा जर माझ्या MP3 प्लेयर मधे कुलवधू चा टाइटल सॉंग सापडला किवा साकची सुरवात किशोर किवा रहमान किवा शंकर एहसान लोय ने न होता 
  गुलाम आली च्या मयताला म्हणतात त्या गाण्याने   झाली तर अजून सुद्धा चुकल्या सारखा वाटता.
                     एव्हाना घरचा जेवण मीळत आहे  हा समज चुकीचा ठरला होता .आमच्या दीदी ची जेवण तयार करण्या ची अजब तर्हा आहे ,सगळ्या मधे एकच मसाला जातो मग ती भाजी असो व दाल 
गोल मसल्या चा दबा एकदा clockwise अणि एकदा  anticlockwise फिरवत ती मसाले टाकते (किवा ओतते) .एकदा कुठलीशी भाजी करताना तिने धरम ला विचारले  "धरम खुशबु आ रही है क्या ?" धरम ने झोपेत नाही म्हंटला अणि तिने उरले सुरले सगले मसाले ओतून टाकले "अब आ रही है ?"  अता होय म्हण्या पलिकडे मार्गच न्हावता कारण एव्हाना नकातले केस कधीच जळाले होते .
                        दीदी सगळा काही बनवते चाइनीज ,महाराष्ट्रियन ,अफ्रीकन सगळा काही कारण सगळ्यात एकच मसाला लागतो ना...गरम मसाला . मग ती पाव भाजी बनवताना हिरव्या मिर्ची ची फोडणी   काय  देते अणि अणि मेगी ला डीप फ्री कई करते .ती तिहार जेल मधे जेवण बनवत होती अशी मला दाट शंका आहे  कारण २ माणसाना जेवढा जेवण लगता तेवढाच ७ लोकाना लगता अशी तिची समजूत आहे .
                  माझा नशीब बघा अशे नमूने मला अनेक मिळतात ,अता आमचा डायरेक्टर IAS  आहे खरा दोन सोफ्वारे ऍप्लिकेशन एकत्र आणताना "एक पेन ड्राइव लो और यहाँ से वह कॉपी करदो " असा सल्ला त्य्ने दिला . आईएस अधिकारी तल्लख  बुद्धीचे असतात हे ऐकण्यात होता पण ती बुद्धि एवढी तल्लख असेल असा वाटला नवत . एकदा   foreign deligates समोर प्रेजेंटेशन देताना देवानंद सारखा नाचला होता आमचा पृथ्वीराज चौहान चा नातलग " आर चौहान "   त्याच्या समोर हसू रोखून धरना  मला असह्य झाला होता .
                               सर्वाना सध्या आमच्या रूम वर टेंशन आहे  ,विशाल अणि रसिक मुली बघून आले आहेत लग्न साठी अणि त्यात भाजी चे भाव चक्क  अक्ख्या ५ रूपया ने वाढले आहेत . सुभाष ला जापानी भाषे चा अभ्यास करायचा आहे  ,मागील  वेळेस  एका मार्काने तो नापास झाला  मे त्य्चा सांत्वन केला पण नातर कल्ला की तो २ ऱ्या वेळेस  एका मार्काने  नापास झाला आहे .आज कल त्याने बाकि सर्वाना रूम मधे दंगा करण्या पासून मज्जाव केला आहे कारण त्याला अभ्यास करायचा  असतो  ,४ तास अभ्यास करण्या च्या तयारी मधे घलाव्ल्या नंतर तो ३० मिनिटे मन लाउन  अभ्यास करतो अणि मग फक्त १० तास झोपतो  .
                                    बहुतेक माझी सत्वापरिक्षा संपत आली आले अणि ह्यांची सुरु झाली आहे . :ड 

Comments

  1. केद्या नेहमीप्रमाणेच मस्त लिहितोयस...
    वाचायला (नेहमीप्रमाणेच) मज्जा येतेय..

    फक्त जाता जाता एक (नेहमीप्रमाणे) सूचना .. :D
    (नेहमीप्रमाणेच) सूद्ध लेखनाच्या चुका हाइती.. तेवढ्या कमी केलास तर अधून मधून होणारा सौम्य रसभंग टळेल आणि (ह्या पेक्षा) जास्त रसनिष्पत्ती होईल! :-)

    ReplyDelete
  2. अत्यंत सुंदर लेख लिहिलाय, अगदी प्रत्येक ४ ओळींनंतर मुखावर हसू उमटतच ! मस्त ! खरं मी म्हणीन केद्याची सत्वपरीक्षा खर्या अर्थाने पुणे स्थानकाच्या त्या फलाट क्रमांक ३ वर सुरु झाली जेंव्हा आम्ही सगळे एखाद्या मुलीचं लग्न झाल्यावर तिच्या बिदाईच्या वेळी होतो त्या रुदन कार्यक्रमाला आल्या सारखे त्याची बिदाई करायला आलो होतो. शब्दात न मांडता सुद्धा केद्याचा चेहरा खूप काही बोलून गेला. पण KD चा स्वभाव असा आहे कि त्याला टाकावं त्या ठिकाणी त्याचा "कट्टा" निर्माण होतो, त्यामुळे दिल्लीला जाऊन त्याच्या अनुभवांमध्ये नवीन भर पडली आणि पर्यायाने आपल्याला हा लई भारी blog वाचायला मिळाला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Do's & Dont's in Manipur

Sin La Trek : Conquering yourself

Pin Parvati Pass Trek : Conquering the heights