माझी सत्वापरिक्षा
टाइटल बघून चरकू नका अलका कुबल च्या सुपर हिट मराठी चित्रपटाचा अणि ह्याचा कही एक सम्बन्ध नाही आहे माणसाला त्याच्या आयुष्या मधे एकदा न एकदा तरी सत्वापरिक्षा द्यावीच लागते .तसा विद्यार्थी समुदाया साथी प्रत्येक परीक्षा ही सत्वापरिक्षाच असते पण तरी सुद्धा ह्या सर्वा संकटांची बाप म्हणजे सत्वापरिक्षा .ह्या परिक्षे चे विषय आपण नाही ठरवत अणि ह्याची तारीख सुद्धा आपण नाही ठरवू शकत .म्हणजे एका अत्यंत लाचखोर सरकारी नोकाराच्या डोक्या वर जर एखादी गाँधी ,नेहरु ची औलाद आली की मग त्यची सत्वापरिक्षा सुरु होते ...अभीयांत्रिकी च्या विद्यार्थ्या साथी तोंडी परीक्षा सत्वापरिक्षाच असतात ,लग्नाला आलेल्या मुली / मुलांच्या सत्वापरिक्षेला "कांदा पोहे " हा सक्तिचा विषय असतो ..मैत्रिण लाथ मारून स्वताच्याच मित्र बरोबर पळुन गेली किवा कही मुलांच्या साठी गेलेली मैत्रिण परत आली की मग सत्वापरिक्षा सुरु होते ,हरभजन सिंह ची एंड्र्यू स्य्मोंड्स ४० व्या ओवर मधे स्ट्राइक वर आला की सत्वापरिक्षा सुरु होते अणि राहुल द्रविड़ स्ट्राइक वर आला की बाकि सर्वांची सत्वापरिक्षा सुरु होते .तर मतित अर्थ काय तर सर्वाना त्